Sunday, August 22, 2010

हा च तो पाऊस.. ज्याला भिजवायची हौस..

Friday, August 6, 2010

तुझ न् माझ कधी जमल च नाही..
प्रश्न कोणताही आणि कोणाचाही असला
तरी उत्तर दोघा नी शोधायचा असता हेच कधी उमगल नाही...
तुझ न् माझ कधी जमल च नाही..

फिरत राहिलो समजूतदारपणाचे मुखवटे घालत
इच्छा असून ही ते फाडायाचा प्रयत्न च केला नाही..
तुझ न् माझ कधी जमल च नाही..

Thursday, August 5, 2010

हसू का रडू मला खरच कळत नाही..
तुझ्या कविता नी मला नवी ओळख दिली खरी..
पण आता ते कविते मधे च जास्त शोधतात मला..

Friday, July 30, 2010

आधीच मनातल काहूर.. त्यात पावसाची भूरभूर...
आज लागतीये तुझ्या आठवणी ना माझीच नजर...

Friday, July 2, 2010

तो कोडी घालत गेला मी त्याची उत्तरे शोधत बसले..
तो अडथळे निर्माण करत बसला मी मार्ग शोधत बसले..
अश्रद्ध म्हणता म्हणता त्याच्या असण्या पेक्षा नसण्यावर च जास्त श्रद्धा ठेवत गेले..
छेडला जाऊन ही सतार एवढा सुरेल प्रतिसाद का देते..
मार खाऊन ही तबला आपल्याच तालामधे का असतो..
क्रुतघ्न वागलेला असून ही एखाद्या कडून कृतज्ञतेचि अपेक्षा का ठेवली जाते...
स्वभाव अजुन काय म्हणणार याला...

Thursday, July 1, 2010

उत्तर माहीत असून हजारदा एक च प्रश्न का छळतो..
परत कोरडी होणार हे माहीत असून ही पाऊस का एवढा जमीनीला भिजावतो..
कोणी दिसणार नाही माहीत असून ही नजर तिथे च का शोध घेते..
सवय अजुन काय म्हणणार याला...