Thursday, May 20, 2010

कधी तुटली जिथे स्वप्ना त्यानी बनवली त्याची नक्षी...
कधी फाटलेल्या उद्या ला ठीगळ त्यानी लावली...
जिंकून हरणा आणि हरून जिंकायला यानीच तर शिकवला....
नशिबा ने मिळते म्हणतात पण मला खरच लाभलीये अशा लोकांची मैत्री...

Thursday, May 13, 2010

मनातले बोलायचे असून गप्प राहण्याची आगतिकता..
हजारोंच्या गर्दी मधे भयाण शांतता..
या शांततेला "subtitles" का नसतात..

Thursday, April 29, 2010

वाटा थकल्या तरी ना थकली ही आपल्यामधली अंतरे...
ना तुला उमगली ना मला समजली ही दूराव्याच्या मौनाची भाषांतरे....

Wednesday, April 21, 2010

श्‍वास अडकतोय... जीव गुदमरतोय... आज खूप दिवसानी मोकळ्या हवेचा चेहरा बघितला...

Wednesday, April 14, 2010

मी हळव लिहून तुला दुखावणार..
तू काही प्रतिक्रिया ना देऊन मला छळनार...
दिवस रात्री च्या खेळापेक्षा हा खेळ रंगत चालला आहे...

Friday, April 9, 2010

बोलायचे असून बोलू ना शकलेली निशब्द माझी वाणी...
भातुकलीच्या खेळामध्ये कायम राणी च केविलवाणी ...

Thursday, April 8, 2010

लिहीत नाही म्हणून तक्रार करतोस..
म्हणजे तू पण कुठेतरी माझी वाट बघतोस..
काय करू हल्ली डोळ्यात सारखा कचरा जातो...