Monday, June 21, 2010

कधी फिरतो जुन्या रस्त्यांवर शोधत ओळखीच्या पाऊलखुणा...
खुणा सापडो अगर न सापडो नवीन ठसे नक्की उमटतात...
परत वाटला तर शोधण्यासाठी...

Monday, June 14, 2010

जिथे चुकलेल्या आज वर मनसोक्त हसलो..
तिथेच अनोळखी उद्या ला एकत्र साद घातली..
नव्या वाटा नवी गावा धुंडाळत चार दिशा ना ही गेलो..
आज परत त्या जुन्या रस्त्यानी आठवण करून दिली आहे सगळ्याची..

Wednesday, June 9, 2010

एकदा एका रात्री म्हणला मांडावा हिशोब चुकलेल्या गणिताचा
सोबतीला घेऊन चंद्र आणि चांदण्या...
ती रात्र च अमावस्येची निघाली..

Thursday, May 20, 2010

कधी तुटली जिथे स्वप्ना त्यानी बनवली त्याची नक्षी...
कधी फाटलेल्या उद्या ला ठीगळ त्यानी लावली...
जिंकून हरणा आणि हरून जिंकायला यानीच तर शिकवला....
नशिबा ने मिळते म्हणतात पण मला खरच लाभलीये अशा लोकांची मैत्री...

Thursday, May 13, 2010

मनातले बोलायचे असून गप्प राहण्याची आगतिकता..
हजारोंच्या गर्दी मधे भयाण शांतता..
या शांततेला "subtitles" का नसतात..

Thursday, April 29, 2010

वाटा थकल्या तरी ना थकली ही आपल्यामधली अंतरे...
ना तुला उमगली ना मला समजली ही दूराव्याच्या मौनाची भाषांतरे....

Wednesday, April 21, 2010

श्‍वास अडकतोय... जीव गुदमरतोय... आज खूप दिवसानी मोकळ्या हवेचा चेहरा बघितला...