Tuesday, November 30, 2010

जो दिल मे हैं वो ज़ुबान पे नही होता...
क्यों की जिंदगी का मंज़र इतना आसान नही होता..
जो हासिल ना हो उसके ख्वाब नही देखा करते..
लेकिन उन ख्वाबों मे ही जिंदगी के फसाने है बसर करते..

जे मनात असते ते कधीच ओठांवर नसते..
कारण मित्रा जग हे कायम असेच फसवे असते..
मृगजळा मागे धावायाचे नसते...
हे कळून ही मन मात्र तिथे च रमते.

Sunday, October 3, 2010

कोण म्हणता कोणाच्या असण्या नसण्या ने फरक पडतो..
तू होतास त्याची ही कविता व्हायची..
तू नाहीस याची ही कविता होते..

Friday, October 1, 2010

पाऊस तुझ्या मनातला आज माझ्या डोळ्यात साचला..
कोण कुठला नभ बघ ना सुर्या वर दाटला...

Sunday, September 12, 2010

कधी विनाकारण रडणे..
कधी मनमुराद हसणे..
कधी गर्दीत विसावा..
कधी शांत एकांत..
कधी चिंते ने आयुष्यावर लावलेला सट्टा..
कधी निवांत शिळ वाजवत गाजवलेला कट्टा..
माणूस म्हणल्यावर चालायचा च सगळा...

Sunday, August 29, 2010

एकदा म्हणलं दैवाला देऊन बघावा भाव
काहीतरी आयुष्यात चमत्कार घडव राव...
दैव हसला आणि म्हनला जा रे बाबा पुढच्या घरी
तुझ्याहून जास्त भाव देणारे भेटतात दारोदारी...
ठरवला तेवा दैवपेक्षा आपण च व्हायचा मोठा
आभाळ ला हात टेकून त्याला बनवायचा खुजा...
त्या दिवसा पासून माझी झुंझ चालू आहे
निकाल काही लागो झुंझ आमरण आहे...

Saturday, August 28, 2010

कोण म्हणतो भावने मधे नसतो व्यवहार...
शेवटी ती ही आपली दुसर्‍यामधली भावनिक "गुंतवणूक" च असते यार..