Tuesday, March 30, 2010

ना इर्षा कोणी पुढे गेल्याची..
ना खंत मागे राहिल्याची...
मैलाचा "दगड" म्हणून मिरावण्यापेक्षा
अपयशी "माणूस" म्हणून ठोकारलेला परवडला मला...

Friday, March 26, 2010

दुष्काळ पडलाय.. पाण्याची कमतरता आहे..
कोणी डोळ्यांवर धरण का नाही बांधत...

Thursday, March 25, 2010

तू तुझा मार्ग शोधलास..
मला माझा रस्ता सापडला..
कधी वाटा जुळल्या तर भेटू...

Tuesday, March 23, 2010

तुझ्या साठी रिमझिम धारा.. माझ्यासाठी आभाळ च फाटला..
तू तोडून गेलास तो तुझपरी कच्चा धागा..
माझ्यासाठी आयुष्याचा दोर होता..
तू गेलास आणि सगळे झाले बेईमान माझ्याशी...
तू असताना हसवायचा हा पाऊस मला...
आता खिडकीतून वेडावून बघ ना कसा रडवतोय मला....

Monday, March 22, 2010

मी असल्याने ना फरक पडला तुला...
ना मी साथ नसल्याची खंत...
उधळून दिल्यास ना माझ्या खुणा सगळ्या तू...
माती मधे माती झाली त्याची.. शोधून कुठे शोधणार....
उभे शब्द.. आडवे शब्द...
चौकटी मधल्या रिकाम्या जागा...
आयुष्याचे असे कोडे होईल वाटला नव्हते...
ना मन ना भावना.. ना कसलीच प्रतिक्रिया..
दगड आहेस नुसता दगड..
यात तुझी तरी काय चुक म्हणा..
मी च शेंदुर फसून तुला देव केला...

Sunday, March 21, 2010

आसमान मे कोई तारा टूट गया..
शायद किसीसे कोई अपना बिछड गया...
चलो कोई बात नही.. एक सपना ही तो बिखर गया....

Saturday, March 20, 2010

आटपाट नगर.. एक राजा आणि एक राणी..
द्रूष्ट लागावी अशी त्यांची कहाणी.. पण..
पण नंतर च परी कथे ची सत्यकथा होते..

कपड्यांवरचे चोकोबार चे डाग लोलिपोपने चिकट झालेले हात ..
गुडघा आणि कोपरा वरची जखम.. आई ने हळुवार लावलेला मलम..
पापण्यांच्या ओल्या कडा अशा अनेक आठवणी सांभाळून आहे..

Thursday, March 18, 2010

डाग आहेत म्हणून च निघून गेलास ना लांब...
यासाठी च का आधी चंद्र म्हणायचस मला...

Tuesday, March 16, 2010

मी आतुर तुझा प्रत्येक शब्द झेलायाला...
जसा समुद्र आतुर चंद्राला बघायला..
अमावस्या सगळ्यांच्या च आयुष्यात येते वाटत..

Sunday, March 14, 2010

कसले आरोह कसले अवरोह..
मला अनुभवू दे तुझ्या भावने चा डोह...
तू आणि फक्त मी.. आता नको परत विरह...

मारवा ची हाक..
हातात तुझा हात..
हवी असलेली साथ..
खरा सांगू लिहीणे थांबवून तुला वाचावे असा वाटत आहे....
तुला रुसता येता..
मला मनवतायेत..
एकदा कधीतरी रुसून पण बघायला पाहिजे ना मी...

Friday, March 12, 2010

मी म्हणते पूर्व तर तो म्हणे पश्चिम..
मी म्हणते दिवस तर तो म्हणे रात्र..
काय रे देवा.. मला मन दिला टिपकागदा सारख..
आणि त्याच्या मनाला कायम "Plastic Coated Cover"

Monday, March 8, 2010

तुझे मन किनार्‍याच्या रेती सारखे माउ..
एक लाट आली आणि बघ ना..
नाव पुसून पण गेले माझे.....

Friday, March 5, 2010

यूँ दबे पाव रात आती है
हमसे वो मिन्न्ते करती है..
हम भी जग कर कभी उस का साथ दे देते है...
धुंद वारा.. चोरटी नजर..
तो स्पर्श.. ती लाज..
पहिल्या पावसा नंतर बरच पाणी वाहून गेलय तस..

Monday, March 1, 2010

बोलकी नाती अबोल होतात..
मनातल्या गोष्टी डोळ्यातल्या पाण्याबरोबर विरून जातात...
यालाच कदाचित रस्ते वेगळे झालेत असा म्हणतात..