Sunday, February 28, 2010

वेगळा मार्ग शोधला पाहिजे..
तू ला बाहेर काढण्याचा..
रूमालाला तरी किती तो त्रास द्यायचा...

Friday, February 26, 2010

पेन थकलय..
शाई सुकली आहे..
तरी पण लिहायला हवा..
तिथेच तर तुझ्याशी मनसोक्त बोलू शकते....

Thursday, February 25, 2010

आठवणी.. शपथा.. वाद.. संवाद..माफ कर आणि विसरून जा असा म्हणतोस का..प्रेमात सगळा माफ असते ते हेच का..


एका "नाही" मुळे बर्याच कवितांचे अर्थ समजले... पण आयुष्याचे काव्य व्हायचे राहून गेले...

हिशोब

दु:ख याचा च आहे की तू सवयी बघितल्यास
भावना नाही...
तो हिशोब ठेवताना त्या ला परत जगण्याची आस नाही..
बेहिषोबी एक च गोष्ट केली मी..
तुझ्या वर प्रेम...
तुझा तर चुकलेला हिशोब ही बरोबर निघाला.
सोड ना कशाला करतोस इतका माझा नाद
तसे ही तुटले आहेत आपल्या मधले सगळे च संवाद
आठवणींच्या वादलाने उद्धव्स्त होण्यापेक्षा
त्यांच्या झुलुकीने समृदध होऊ या...
प्रत्येक प्रवासाचा अंत मुक्कामवर होणा गरजे चा तर नाही ना..

डियर

तू दिशा बदललिस आणि मी दिशाहीन झाले
काय करू अजुन ही तुझी जाणीव तशी च आहे
रेडियो वर लागलेल गाणा ही ते च आहे
आणि आपण एकत्र घालवलेले क्षण ही तसेच आहेत...
ते गाणे संपून जाईल..
क्षण ही विरून जातील..
तुला डियर म्हणणा च तर फक्त राहून जाईल...

मिटून गेलेली कधी ही ना उमलण्यासाठी..
तुझी नसलेली
डियर...

एक अनामिका

तुझा तबल्याचा नाद खूळ लावायचा मला...
तुझ्या बोटांची आणि माझ्या हृदयाची लय एक होऊन जायची..
हात ठेवला तो स्वत: ला थांबवण्यासाठी...
पण तिथेच तर वाहवत गेले..
वाट बघत होते त्या आवेगा ला तुझ्यात सामावून जाण्याची..
काश जालीम.. वो हात तूने कभी छोडा ना होता...

तुझीच पण कधी ही तुझी ना झालेली..
(नाव गरजेचा आहे का?)
एक अनामिका

ओळख

काय मजा आहे ना...
साधे सरळ धागे घेऊन स्वप्ना विणत होतो..
इतके रमलो की गुंता झालेला कळला च नाही..
तुझा स्पर्श...
तुझी उब..
माझी ओळख मलाच करून दिली यानी...
आता त्या पासून पळतेय.. परत तू ला च धडकुन पडण्यासाठी

बंध

गोष्टी सोडल्याने आठवणी सुटत नाहीत रे..
खूप उशिरा कळला..
जेव्हा सैल सर बंध घट्टा गाठ होऊन बसले..
आता पाऊस ही नाही लागत तुला आठवायला...

चहा

माझ्या पाणचट चहा च्या आठवणी ने तुझी चव खारट झाली?
खरा सांगू का खोटा?
ऐकून माझ्या जिभेची कडवट चव गढूळ झाली...
चहा तर कधी च सोडलाय...

Monday, February 22, 2010

एक आठवण

आठवतय जेव्हा पाऊस आपल्या घरा च्या खिडकीतून वेडवायाचा..

तेव्हा ती ओढ नकळत तलावापाशी एकत्र आणायची आपल्याला
टपरी वरचा गरम चहा आणि हळवा नाजूक लागणारा बोलणा
अगदी तो चहा पावसाने पाणचट करे पर्यंत..
तू निघून गेल्यावर ती पाणचट चहा ची चव च तर रेंगळतेय..
अजून ही....