Sunday, August 29, 2010

एकदा म्हणलं दैवाला देऊन बघावा भाव
काहीतरी आयुष्यात चमत्कार घडव राव...
दैव हसला आणि म्हनला जा रे बाबा पुढच्या घरी
तुझ्याहून जास्त भाव देणारे भेटतात दारोदारी...
ठरवला तेवा दैवपेक्षा आपण च व्हायचा मोठा
आभाळ ला हात टेकून त्याला बनवायचा खुजा...
त्या दिवसा पासून माझी झुंझ चालू आहे
निकाल काही लागो झुंझ आमरण आहे...

Saturday, August 28, 2010

कोण म्हणतो भावने मधे नसतो व्यवहार...
शेवटी ती ही आपली दुसर्‍यामधली भावनिक "गुंतवणूक" च असते यार..

Wednesday, August 25, 2010

कधी थेंब थेंब तर कधी भिजवी आसमंत सारा..
कधी संतत धार तर कधी धबधब्याला ही लाजवे हा वेडा..
ना वारा ना वादळ ना कसलाच याला सोस..
हा च तो पाऊस ज्याला भिजावायची हौस...

Sunday, August 22, 2010

हा च तो पाऊस.. ज्याला भिजवायची हौस..

Friday, August 6, 2010

तुझ न् माझ कधी जमल च नाही..
प्रश्न कोणताही आणि कोणाचाही असला
तरी उत्तर दोघा नी शोधायचा असता हेच कधी उमगल नाही...
तुझ न् माझ कधी जमल च नाही..

फिरत राहिलो समजूतदारपणाचे मुखवटे घालत
इच्छा असून ही ते फाडायाचा प्रयत्न च केला नाही..
तुझ न् माझ कधी जमल च नाही..

Thursday, August 5, 2010

हसू का रडू मला खरच कळत नाही..
तुझ्या कविता नी मला नवी ओळख दिली खरी..
पण आता ते कविते मधे च जास्त शोधतात मला..