Friday, December 31, 2010

Happy New Year :)

२००४ - २०००८ आणि २००९
जेव्हा कॉलेज च्या मोकळ्या हवेतून क्यूबिकल मधल्या ए. सी. च्या हवेत गुदमरलो..
काही जीवभावा चे सख्खे मित्र बनवले...

states ला जाणार्‍या मित्रा ना निरोप देताना डोळे पाणावले...
काही जन प्रेमात पडले.. काही प्रेमा तून बाहेर पडले..
काही दुखावले गेले..
जेव्हा तुम्हाला कोणी आवडले पण त्याला तुम्ही नाही आवडला...

जेव्हा आपण चुका केल्या...
आयुष्यात काही ठाम निर्णय घेतले... आणि त्या निर्णया मुळे तोंडघशी पडलो..
जेव्हा आपल्यातले काही जण एकटे पडले..
तर काही त्यातून अजुन strong बनायला शिकले..

जेव्हा आपल्या मधल्या काहीनी " प्रत्येक गोष्टी मागे कारण असते" हे मानले..
काही नी आपल्या मधल्या रागा ला नवीन दिशा दिली..
काही नी आपल्या भावना आपल्यात च मिटून घेतल्या..
काही आपल्या धुंदी मधे "आपण आहोत ते भारी आहोत" म्हणत खुश राहीले..
जेव्हा रोज कट्टा हा आयुष्या चा अविभज्य भाग होता..
आणि future बद्दल स्वप्ना बघणे हे च aim होता..

जेव्हा कुठल्यातरी अनोळखी देशात "अधांतरी" ऐकून अस्वस्थ झालो...
पहिल्यांदा कांदा चिरताना आई च्या आठवणी ने ढसाढसा रडलो..
जेव्हा एकमेका ना सगळ्या गोष्टींमधे साथ दिली...
रात्र रात्र जेव्हा मोकळ्या रस्त्यांवर असेच भटकलो..

पुढ च्या महिन्या चे budget ठरवून ते कधीच नाही पाळला...
काही नवीन शिखरे सर केली तर काही दर्यांमधे ही डोकवून आलो...

२०११ एक नवीन वर्ष...
जुने crushes विसरण्यासाठी...
हसण्यासाठी...
जाणून घेण्यासाठी की आपण लोकांसाठी काय आहोत...
आपल्याच चुकांमधून नवीन काही तरी शिकण्यासाठी...
नवीन स्वप्ना बघण्यासाठी..
आणि ती प्रत्यक्षात यावीत म्हणून लढण्यासाठी...
आणि दुसर्‍या ला खुश ठेवण्यासाठी....

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!

Monday, December 20, 2010

अबोलीची माळून फुले गुलाबा तले काटे तू वेचलेस...
समुद्राच्या रेती वर पावला चे ठसे ही तू जपलेस..
स्वभावाच्या सात रंगाचे इंद्रधनुष्य ही लीलया पेलालेस...
येणार्‍या अश्रूना अलगद रोखलेस...
कधी झाकोळला सुर्य तर वाटेतला प्रकाश ही तू च..
कधी रुसला चंद्र तर शीतल चांदणे ही तूच..
माझ्या भूमितीच्या नियमाचे सार तू...
त्रिकोणाचे कोन ही आणि वर्तुळा चा परिघ ही तू..